Join us  

SBI खातेधारकांसाठी खुशखबर! बँकेची 'ही' सुविधा मार्चपर्यंत उपलब्ध होणार, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:43 PM

SBI : एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव (FD) वर जास्त परतावा देत आहे. एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजने पुन्हा एकदा वाढवली आहे.

नवी दिल्ली : जर तुमचे बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) असेल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव (FD) वर जास्त परतावा देत आहे. एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजने पुन्हा एकदा वाढवली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी एसबीआयने  (SBI) ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना 'SBI Wecare'ला 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. ही सप्टेंबर 2020 मध्ये एसबीआयने सुरू केली होती. याला ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्यानंतर आता बँकेने त्यात पुन्हा वाढ केली आहे.

30 बेसिस पॉइंट्सचे अतिरिक्त व्याजएसबीआयची  (SBI) ज्येष्ठ नागरिक विशेष मुदत ठेव योजना 'SBI Wecare' मध्ये पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या मुदत ठेवीवर 30 बेसिस पॉइंट्सचे अतिरिक्त व्याज उपलब्ध आहे. मुदत ठेवीवर बँकेकडून 5 वर्षांसाठी 5.65 टक्के व्याज दिले जाते. परंतु विशेष योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांसाठी मुदत ठेवीवर 5.45 टक्के व्याज दिले जाते.

एसबीआयच्या मुदत ठेवीवरील दरएसबीआयकडून  (SBI) 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात 15  बेसिस पॉइंट्स वाढ करण्यात आली आहे. हे वाढीव दर 13 ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. एसबीआय सामान्य नागरिकांना मुदत ठेवीवर 2.90 टक्के ते 5.65 टक्क्यांपर्यंत व्याज देईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवलेल्या मुदत ठेवीवर बँक 3.40 टक्क्यांवरून 6.45 टक्के व्याज देईल.

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडियागुंतवणूक