Join us  

आता Flipkart द्वारेही करता येणार UPI पेमेंट, 'या' कंपन्यांना देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 9:57 AM

ई-कॉमर्स कंपनी Flipkart नं स्वतःची युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सेवा सुरू केली आहे.

Flipkart UPI: ई-कॉमर्स कंपनी Flipkart नं ॲक्सिस बँकेच्या मदतीनं स्वतःची युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सेवा सुरू केली आहे. रविवारी फ्लिपकार्टकडून ही नवी सेवा लॉन्च करण्यात आली. ही सेवा सुरुवातीला Android युझर्ससाठीच असेल. यामुळे ग्राहकांना डिजिटल पेमेंट करण्यासाठी आणखी सोपं पर्याय उपलब्ध होतील. फ्लिपकार्टची प्रामुख्यानं स्पर्धा ॲमेझॉन पे सोबत होणार आहे. 

वॉलमार्टची कंपनी फ्लिपकार्टची सर्वात मोठी स्पर्धक  ॲमेझॉन आहे. ही कंपनी पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारख्या पेमेंट सेवा कंपन्यांशिवाय स्वतःची ॲमेझॉन पे सेवा चालवते. फ्लिपकार्टनं २०१६ मध्ये PhonePe चं अधिग्रहण केलं होतं. परंतु २०२२ च्या अखेरीस कंपनीनं यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षीपासून फ्लिपकार्टच्या युपीआय ​​सेवेची चाचणी सुरू होती. आता ग्राहक “@fkaxis” UPI हँडलवर रजिस्टर करू शकतात आणि फ्लिपकार्टच्या ॲपद्वारे पैसे पाठवणें आणि पेमेंट करणं यासारख्या फीचर्सचा लाभही घेऊ शकतात. 

या युपीआयच्या मदतीनं फ्लिपकार्टमध्ये किंवा ऑनलाइन, ऑफलाइन दुकानांमध्ये पेमेंट करता येणार आहे. ग्राहकांना सुपरकॉईन्स आणि ब्रान्ड व्हाऊचर, तसंच अन्य फायद्यांसह सुरक्षित आणि सुविधाजनक पेमेंट पर्याय देऊन उत्तम शॉपिंगचा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया फ्लिपकार्टच्या फिनटेक आणि पेमेंट्स ग्रुपचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट धीरज अनेजा यांनी दिली. यासोबतच रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठीही सोपी आणि जलद सेवा मिळणार आहे.

टॅग्स :फ्लिपकार्टअ‍ॅमेझॉन