Join us  

काम लवकर उरकून घ्या, एप्रिल महिन्यात बॅंका राहणार ११ दिवस बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 8:44 AM

एप्रिल महिन्यात अनेक सण येतात. त्यामुळे ११ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. 

मुंबई :  नवे आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू हाेणार आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात २०२३-२४ पासून काही मोठे बदल होणार आहेत. एप्रिल महिन्यामध्ये बॅंकेत महत्त्वाची कामे असतात. त्यामुळे या महिन्यात बॅंका किती दिवस बंद राहतील, याबाबत माहिती आवश्यक आहे. एप्रिल महिन्यात अनेक सण येतात. त्यामुळे ११ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. 

या सुट्ट्या विविध राज्यांनुसार कमी-अधिक आहेत. एप्रिल महिन्यातील सुट्यांची सुरुवात ही १ एप्रिलपासून होईल. या दिवशी आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्याने बँकांना सुटी असेल. त्यानंतर विविध सुट्ट्यांमुळे बॅंका ११ दिवस बंद राहतील.अशा आहेत सुट्ट्या२ एप्रिल : रविवार ४ एप्रिल : भगवान महावीर जयंती७ एप्रिल : गुड फ्रायडे८ एप्रिल : दुसरा शनिवार९ एप्रिल : रविवार१४ एप्रिल : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती१६ एप्रिल : रविवार२२ एप्रिल : रमजान ईद, दुसरा शनिवार२३ एप्रिल : रविवार३० एप्रिल : रविवार 

टॅग्स :बँक