Join us

जुनं क्रेडिट कार्ड बंद केलं तर खराब होतो का सिबिल स्कोअर? याबद्दल बँकवालेही सांगत नाहीत

By जयदीप दाभोळकर | Updated: March 22, 2025 12:46 IST

Credit Card Cibil: चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यासाठी अनेक युजर्स आपल्या आर्थिक निर्णयात सावधगिरी बाळगताना दिसतात. पण जर तुम्ही क्रेडिट कार्ड बंद करत असाल तर त्याचा तुमच्या हिस्ट्रीवर काय परिणाम होतो, जाणून घेऊ.

Credit Card Cibil: चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यासाठी अनेक युजर्स आपल्या आर्थिक निर्णयात सावधगिरी बाळगताना दिसतात. अशा परिस्थितीत जुनी क्रेडिट खाती बंद करण्याचा निर्णय ही गंभीर बाब आहे, ज्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट हिस्ट्री आणि स्कोअरवर होऊ शकतो. जुनी खाती बंद केल्याने क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो हे अनेकांना माहित नसतं, तर चला आज त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

जेव्हा एखादी व्यक्ती जुनं क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन अकाउंट बंद करते, तेव्हा तो त्याच्या क्रेडिट हिस्ट्रीच्या सतत पेमेंटचा रेकॉर्डही बंद करतो. क्रेडिट स्कोअरची गणना करताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं आपले कर्ज वेळेवर किती वेळा आणि किती काळासाठी फेडलं आहे. दीर्घ कालावधीत सातत्यानं चांगलं क्रेडिट वर्तन ठेवल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर मजबूत होतो, ज्यामुळे भविष्यात कर्ज मिळणे सोपं होतं. जर आपण आपली जुनी खाती उघडी ठेवली तर ते आपल्या क्रेडिट रिपोर्टमध्ये सकारात्मक योगदान देतं आणि लेडर्सप्रती आपली विश्वासार्हता दर्शवते.

क्रेडिट कार्ड बंद करणं का नुकसानीचं?

जर कोणी आपलं जुनं क्रेडिट अकाऊंट बंद केलं तर त्यांची एकूण उपलब्ध क्रेडिट लिमिट कमी होते. जर खर्चाची पद्धत अशीच राहिली तर क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढू शकतो, ज्याचा क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. हे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी असावं, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. उदाहरणार्थ, जर तुमचं क्रेडिट लिमिट १,००,००० रुपये असेल तर तुमचं क्रेडिट युटिलायझेशन रक्कम ३०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावं.

क्रेडिट स्कोअरमध्ये तात्पुरती घसरण  

बऱ्याच प्रकरणांमध्ये, जुनी खाती बंद केल्यानं क्रेडिट स्कोअरमध्ये तात्पुरती घट होऊ शकते. कारण यामुळे तुमच्या खात्यांचं सरासरी वय कमी होतं, त्यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री कमकुवत होते. तसंच, जर नुकतीच अनेक नवीन खाती उघडली गेली असतील तर हे त्या व्यक्तीला आर्थिक अस्थिरता आहे असं सुचित होतं, ज्यामुळे कर्जदारांचा विश्वास कमी होऊ शकतो.

टॅग्स :बँक