Join us  

होम लोन घेताना Fixed की Floating व्याजदर घेणं ठरू शकतं योग्य? अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 1:32 PM

आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर अनेक वेळा तुम्हाला गृहकर्जाची मदत घ्यावी लागते.

आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर अनेक वेळा तुम्हाला गृहकर्जाची मदत घ्यावी लागते. गृहकर्ज घेताना प्रत्येकाला कमी व्याजदरात कर्ज मिळावे असंही वाटतं. गृहकर्जावरील व्याज हे फिक्स्ड किंवा फ्लोटिंग दरांवर दिलं जातं. या दोन पर्यायांपैकी ग्राहकाला निवड करावी लागते. कोणता पर्याय चांगला आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही ग्राहकानं स्थिर व्याजदर आणि फ्लोटिंग व्याजदराचे फायदे आणि तोटे समजून घेतले पाहिजेत, असं तज्ज्ञांचं मत आहे. याची तुम्हाला पुढे जाऊन मदत होऊ शकते. या दोघांमध्ये काय चांगलं ठरू शकतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. 

फिक्स्ड व्याजदराचे फायदे-तोटे 

फिक्स्ड व्याजदरातील कर्जामध्ये, कर्जाच्या कालावधीदरम्यान व्याजदर आणि ईएमआय स्थिर राहतात. फिक्स्ड रेट लोनचे काही विशिष्ट फायदे आहेत. यामुळे तुम्हाला दीर्घ कालावधीदरम्यान, किती रक्कम द्यायची हे आधीच माहित असतं. एसबीआय सिक्युरिटीजच्या मते, हेदेखील समजून घेणं महत्त्वाचं आहे कारण बँक ज्या प्रकारे फ्लोटिंग दर अॅडजस्ट करते ती पद्धत खूपच गुंतागुंतीची आहे. वाढत्या व्याजदराच्या परिस्थितीमध्ये फिक्स्ड रेट लोन घेणं फायद्याचं ठरू शकतं. 

फिक्स्ड रेटच्य कर्जाचे तोटेही असतात. गृहकर्ज कर्ज देणाऱ्या बँकेशी संबंधित जोखमीमुळे, निश्चित दराच्या कर्जाची सरासरी किंमत 100 bps ते 200 bps जास्त असते. यामुळे तुमचं व्याज आणि ईएमआय वाढतो. व्याजदर कमी झाल्यास, फिक्स्ड रेटमध्ये तुम्हाला नुकसान सोसावं लागू शकतं. कारण तुम्हाला बाजारातील दरापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. कर्जदारासाठी निश्चित दराच्या कर्जाचा आणखी एक तोटा म्हणजे ते केवळ एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच निश्चित केले जातात. 

फ्लोटिंग रेटचा फायदा नुकसान 

फ्लोटिंग रेट लोनमध्ये बँक रेपो रेट, एमएलसीआर इत्यादी अंतर्गत बेंचमार्कनुसार व्याज दर बदलतो. फ्लोटिंग व्याजदरासह होमलोन, बहुतेक प्रकरणांमध्ये, बेस रेटशी जोडलेले असतात. साधारणपणे, दरांमध्ये किमान थ्रेशोल्ड बदल असेल तरच दरात बदल केले जातात. आज फ्लोटिंग रेट हे होम लोनसाठी अधिक लोकप्रिय आहेत. एसबीआय सिक्युरिटीजच्या मते, निश्चित दराच्या कर्जाच्या तुलनेत, फ्लोटिंग रेट कर्जावरील व्याजदर कमी आहेत आणि फरक 100 bps ते 200 bps पर्यंत असू शकतो. फ्लोटिंग रेट लोन फायनान्शिअल अॅडजस्टमेंटसाठी फारशी अनुकूल नाहीत कारण दायित्वाच्या प्रमाणात अनिश्चितता आहे. वाढत्या व्याजदराच्या परिस्थितीत, फ्लोटिंग रेट कर्जे अधिक महाग होऊ शकतात. साधारणपणे, बँका कर्जदाराला ईएमआय किंवा कार्यकाळ वाढवण्याचा पर्याय देतात. 

जर तुम्ही काळाबरोबर व्याज दर कमी होण्याची आशा करत असाल तर हा रेट फायद्याचा ठरू शकतो. जर व्याजदर कमी-जास्त झाले तर त्याचा परिणाम तुम्हाला जाणवत नसेल तरच हा पर्याय निवडावा. जर तुम्हाला नजिकच्या काळात वाचलेल्या व्याजातून काही बचत करायची आहे तर फ्लोटिंग रेट निवडावा. 

टॅग्स :बँक