Join us

घर खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या मंथली EMIचं गणित, SBI कडून ६० लाखांच्या कर्जाचं कॅलक्युलेशन पाहा

By जयदीप दाभोळकर | Updated: March 21, 2025 14:22 IST

Home Loan EMI Calculation: स्वत:चं घर विकत घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण घर विकत घेणं सोपं काम नाही. घर विकत घेण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते. अशा तऱ्हेनं सामान्य माणसासाठी घर घेणं म्हणजे आपली आयुष्यभराची कमाई त्यात टाकण्यासारखं आहे.

Home Loan EMI Calculation: स्वत:चं घर विकत घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण घर विकत घेणं सोपं काम नाही. घर विकत घेण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते. अशा तऱ्हेनं सामान्य माणसासाठी घर घेणं म्हणजे आपली आयुष्यभराची कमाई त्यात टाकण्यासारखं आहे. अशा वेळी बँकेकडून गृहकर्ज घेऊन घर खरेदी करणं हा उत्तम पर्याय आहे. आजकाल अनेक जण घर घेण्यासाठी बँकेकडून गृहकर्ज घेत आहेत. अशा परिस्थितीत तुम्हीही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला गृहकर्जाचं गणित माहित असणं आवश्यक आहे.

देशातील विविध बँकांकडून ग्राहकांना वेगवेगळ्या व्याजदरानं गृहकर्ज दिलं जातं. अशावेळी गृहकर्ज घेण्यापूर्वी चांगल्या बँकेची निवड करावी. आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयच्या गृहकर्जाबद्दल सांगणार आहोत. एसबीआयकडून गृहकर्ज घेतल्यावर ईएमआय किती लागेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

एसबीआयकडून होम लोन

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय आपल्या ग्राहकांना ८.२५ टक्के सुरुवातीच्या व्याजदरानं गृहकर्ज देते. आपल्या सिबिल स्कोअरच्या आधारे हा व्याजदर बदलू शकतो. जर तुम्हाला एसबीआयकडून ६० लाखांचं होम लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या ईएमआयबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.

एसबीआयकडून ६० लाखांचे गृहकर्ज

जर तुम्ही एसबीआयकडून ६० लाखांचं गृहकर्ज घेत असाल आणि तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला ते ८.२५ टक्के दरानं मिळू शकतं. जर तुम्ही एसबीआयकडून १० वर्षांच्या कालावधीसाठी ६० लाखांचं गृहकर्ज घेत असाल तर तुम्हाला दरमहा ७३,५९२ रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील. अशा परिस्थितीत तुम्ही १० वर्षात एकूण ८८,३०,९८९ रुपये बँकेला देणार आहात. अशा प्रकारे तुम्हाला ६० लाखांच्या गृहकर्जावर २८,३०,९८९ रुपयांचं व्याज भरावं लागेल.

जर तुम्ही एसबीआयकडून ३० वर्षांसाठी ६० लाखांचं गृहकर्ज घेतलं तर तुम्हाला महिन्याला ४५,०७६ रुपयांचा हप्ता बसू शकतो. यामध्ये तुम्ही बँकेला ३० वर्षांमध्ये १६,२२७,३५९ रुपये परत करता. यामध्ये तुम्हाला १०,२२७,३५९ रुपये व्याज म्हणून भरावे लागतील.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियापैसा