Shrawan: श्रावणात नॉनव्हेज का खात नाही?

श्रावण महिन्यात नॉनव्हेज का खात नाही? यामागचं नेमकं कारण तुम्हाला माहितीये का? 

हिंदु कालगणनेनुसार श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात मांसाहार केला जात नाही. 

पण, श्रावण महिन्यात नॉनव्हेज का खात नाही? यामागचं नेमकं कारण तुम्हाला माहितीये का? 

श्रावण महिना हा ऐन पावसाळ्यात येतो. त्यामुळे वातावरणात दमटपणा असतो. त्यामुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात. 

विशेष म्हणजे मांसामध्ये याचं प्रमाण जास्त आढळतं. त्यामुळे या महिन्यात मांसाहार न करण्याचा सल्ला दिला जातो. 

याशिवाय श्रावण महिना हा मासे आणि प्राण्यांच्या प्रजननाचा काळ आहे. त्यामुळे या श्रावणात नॉनव्हेज खाऊ नये. 

हवामान बदलामुळे आपली पचनशक्तीही थोडी मंदावलेली असते. त्यामुळे पावसाळ्यात हलका आहार घ्यावा. 

नॉनव्हेज पदार्थ हे पचण्यासाठी जड असतात. त्यामुळे श्रावणात नॉनव्हेज पदार्थ खाणे टाळावे. 

Click Here