वेद पुराणापासून जानवे वापरात असल्याचे उल्लेख आढळतात, पण देवांना जानवे घालण्यामागे काय असते कारण? जाणून घ्या.
जानवे, ज्याला यज्ञोपवित असेही म्हणतात. ते आत्मशुद्धीसाठी घातले जाते, पण भगवंत स्वतः पवित्र असूनही त्याला जानवे का घालतात? ते पाहू.
गणपती, हनुमान, दत्तात्रेय, श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या गळ्यात जानवे दिसून येते कारण या देवतांनी मनुष्य रूप घेतले.
मनुष्य देहाबरोबर येणारे विकार मनाला जडू नयेत म्हणून या देवतांनी हा पवित्र धागा धारण केला आणि त्याचे नियमही पाळले.
जानवे धारण करणाऱ्या व्यक्तीला त्याचे पावित्र्य जपावे लागते. देवतांनी मनुष्य देहात येऊनही विकार जडू न देता मनुष्य जातीचे कल्याण केले.
म्हणून आजही या देवतांना जानवे घातले जाते. हा सोळा संस्कारांपैकी एक संस्कार मानला जातो आणि षोडषोपचार पूजेचा एक भाग मानला जातो.
या देवतांचे उपनयन अर्थात मुंज झाली नसली तरी त्यांची षोडषोपचारे पूजा केली जाते, म्हणून जानवेदेखील घातले जाते.
जानवे हे केवळ एक प्रतीक नसून, आत्मशुद्धी, ज्ञान आणि समाजाप्रतीचे कर्तव्य याचे सूचक आहे. देवतांनी हे कर्तव्य वेळोवेळी पार पाडले.
त्यामुळे देवतांना जानवे घालण्याचा संबंध कोणत्याही ज्ञातीशी नसून तो पूजेचा एक भाग आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
सदर माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.