२७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे, घरोघरी गणरायचे आगमन होणार आहे, पण एवढी छान मंगलमूर्ती झाकून का आणली जाते? ते जाणून घ्या.
सार्वजनिक गणेशोत्सवात मोठी मूर्ती दिमाखात मिरवत आणली जाते पण छोटी मूर्ती झाकलेली असते, तीच बाब घरगुती गणपतीची.
गजानन अर्थात हत्तीचे शीर असलेला बाप्पा हे सगुण रूप असले तरी ओंकार हे त्याचे मूळ आणि निर्गुण रूप आहे.
चेहरा झाकलेला भाग निर्गुण रूप तर दर्शनीय भाग सगुण रूप असे हे सगुण-निर्गुणाचे स्वरूप घरी आणून तिची पूजा केली जाते.
गणपती हा सुखकर्ता आहे, मंगलमूर्ती आहे, त्यामुळे तो दिसायला अतिशय गोड आहे, त्याला कोणाची दृष्ट लागू नये ही त्यामागची भावना असते.
गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीला देवत्त्व येते आणि म्हणूनच त्यावेळी गणपतीच्या चेहऱ्यावरून कापड काढले जाते.
भाद्रपदात घरी येणारा बाप्पा पावसात भिजू नये म्हणून हे छोटेसे छत्र त्याच्यावर धरून त्याला सावरण्याचा आपला छोटासा प्रयत्न म्हणून ही प्रथा!
तसेच धूळ, ऊन, पाऊस यामुळे मूर्तीचे रंग खराब होऊ नये म्हणूनही मूर्ती झाकून आणली जाते.