ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी नक्की कोण?

यंदा ३१ ऑगस्ट रोजी गौरीचे आगमन आहे, त्यादिवशी ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीला आवाहन केले जाईल, त्या दोघी कोणाची रूपे आहेत ते पाहू. 

भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात, त्यांना ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी म्हणतात.

गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. 

तर काही ठिकाणी ती सखी पार्वती मानली जाते, जी एक मुलगा आणि मुलगी यांनाही घेऊन येते. 

विदर्भात या ज्येष्ठा- कनिष्ठा गौरी-महालक्ष्मी म्हणूनही ओळखल्या जातात. 

स्थानिक किंवा पारंपरिक माहितीनुसार त्या गणपतीची आई होऊन येतात हे नक्की, येण्याचं कारण काय? तर... 

ज्याप्रमाणे प्रत्येक आईला तिचे मूल प्रिय असते, त्याची काळजी असते, त्याच मातृसुलभ भावनेने या दोघी लाडक्या गणोबाच्या पाठोपाठ येतात. 

काही ठिकाणी मुखवट्याच्या तर काही ठिकाणी खड्यांच्या गौरी पुजल्या जातात. कोणाकडे पुरणा-वरणाचा नैवेद्य असतो तर कोणाकडे  मांसाहाराचा!

स्वरूप कोणतेही असले तरी त्या सुख, मांगल्य, सौख्य, संपत्ती, संततीचा आशीर्वाद देऊन जातात. 

यंदा ३१ ऑगस्ट रोजी आगमन, १ सप्टेंबर रोजी पूजन आणि २ सप्टेंबर रोजी विसर्जन केले जाईल.

गौरी आवाहन पासून विसर्जनापर्यंत सविस्तर माहिती; पूजा साहित्य आणि मुहूर्तही!

Click Here