श्रावण सुरु झाला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी शिव उपासनेबद्दल ऐकून वाचून स्वप्नातही शिवमंदिर दिसू शकते, पण स्वप्नशास्त्रात त्याच्या स्थितीबद्दल संकेत दिले आहेत.
आपण दिवसभर जे वाचतो, बोलतो, बघतो, विचार करतो त्याची सरमिसळ आपल्याला स्वप्नात दिसते. त्यावर स्वप्नशास्त्र भाकीत करते.
सध्या श्रावण सुरु झाल्याने या महिनाभरात स्वप्नात शिव मंदिर दिसले तर नवल नाही, पण त्याचेही शुभ-अशुभ परिणाम सांगितले आहेत, कोणते ते पाहू.
श्रावण मासात स्वप्नात शिवमंदिर दिसणे शुभ आहे, ज्यामुळे तुम्हाला यश, कीर्ती, धनलाभ होऊ शकतो आणि कोणत्या स्थितीत पाहणे अशुभ तेही जाणून घ्या.
तुम्ही एखाद्या अडचणीत अडकले असाल आणि स्वप्नात शिवमंदिर दिसले तर लवकरच तुमची संकटातून मुक्ती होणार असल्याचे ते संकेत असतात.
जे लोक मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, किंवा ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे, अशा लोकांना स्वप्नात शिवमंदिर दिसणे संतान प्राप्तीचे लक्षण आहे.
अशा जोडप्यांनी शिव मंदिरात जाऊन महादेवाचा आशीर्वाद घ्यावा आणि गरजू लोकांना दानधर्म करावा.
जर तुम्हाला शिव मंदिराच्या पायऱ्या चढत असतानाचे स्वप्न पडले तर ते तुमच्या आर्थिक वृद्धीचे, धनलाभाचे संकेत समजावेत.
मात्र, स्वप्नात सोन्याचे शिवमंदिर दिसणे अशुभ मानले जाते, याचा अर्थ तुम्ही गैरकाम करत आहात किंवा गैरमार्गावर आहात.
कारण भगवान शिवशंकर हे विरक्तपणे जीवन जगणारे आहेत, त्यांच्याजवळ जायचे तर मोहमाया सोडूनच गेले पाहिजे.
पाण्यावर तरंगते शिवमंदिर दिसणेही अशुभ मानले जाते, त्यामुळे प्रापंचिक संकटं येऊ शकतात.
अशावेळी महादेवाचे दर्शन घ्यावे आणि त्यांनाच संकटनिवारण करण्यासाठी प्रार्थना करावी.
सदर माहिती सामान्य गृहीतकांच्या आधारे दिलेली असून लोकमत सदर माहितीला पुष्टी देत नाही.