सद्यस्थितीत ढासळणारी लग्नव्यवस्था पाहता भविष्य धोक्यात आहे असा नाराजीचा सूर उमटताना दिसतो, याला कारण वयातील अंतर हेही असू शकते.
आचार्य चाणक्य यांनी विवाह संस्थेचे भविष्य पाहता काही नियमावली दिली आहे त्यात वयाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
नवरा बायकोचे नाते दृढ होण्यासाठी त्यांच्या वयात किती अंतर हवे, याबाबत आचार्य चाणक्य यांनी सांगितलेला नियम आणि त्यामागचे कारण जाणून घ्या.
पूर्वी ज्याप्रमाणे नवरा बायकोच्या नात्यात १०-१५-२० वर्षांचे अंतर होते, तसे असणे चूक आहे असे आचार्य सांगतात.
त्यांच्यानुसार नवरा बायकोचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य चांगले असण्याच्या दृष्टीने वयात फार अंतर असून चालणार नाही.
वयाने मोठा असणारा पुरुष कमी वयाच्या मुलीशी विवाह करत असेल तर काही अपवाद वगळता तो विवाह फार काळ टिकणार नाही.
वयामुळे दोघांच्या वयातच नाही तर विचारातही अंतर वाढते, ज्याला आजच्या काळात जनरेशन गॅप म्हणतात.
आचार्यांच्या मते नवरा बायकोमध्ये जास्तीत जास्त ३-४ वर्षाचे अंतर हवे, ज्यामुळे दोघांमध्ये आदर, प्रेम, मैत्री निर्माण होते.
दोघांचे विचार काळानुरूप असल्याने वादाची शक्यता कमी होते, समाजभान राहते आणि ते चांगले मित्र बनतात.
पुरुष मोठा आणि स्त्री त्यापेक्षा लहान अशी रचना करण्यामागे कारण, मुली लवकर प्रौढ होतात आणि योग्य वयात दोघे विचारांनी समपातळीवर येतात.