देवीचा 'गोंधळ' का घालतात?

गोंधळ हा शब्द आपण नकारार्थी वापरत असलो तरी नवरात्रीत केला जाणारा गोंधळ सकारात्मक ऊर्जा देतो, तो का केला जातो ते पाहू!

'देवीचा गोंधळ', ही महाराष्ट्राची एक अनोखी लोकपरंपरा आहे. त्याची सुरुवात कधी आणि कोणी केली याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. 

हा केवळ विधी नसून, देवीच्या उपासनेचा एक कलात्मक जागर आहे, म्हणून महाराष्ट्रात अनेक घरात हा कुलाचार म्हणूनही केला जातो. 

'नाही घातला गोंधळ, तर होतो साऱ्या संसाराचा रोंधळ', अर्थात गोंधळ घातला नाही तर संसार टिकत नाही अशी श्रद्धा आहे. 

गोंधळी समाज पारंपरिक वेशभूषेत आणि हातात मशाली घेऊन हा गोंधळ घालतात. यामध्ये देवीची स्तुतीपर गीते, पोवाडे आणि आरत्या गायल्या जातात.

संबळ आणि तुणतुणे यांसारख्या वाद्यांच्या गजरात वातावरण भारून जाते.

हा सोहळा घरातील मंगल कार्यावेळी किंवा नवरात्रीसारख्या उत्सवात आयोजित केला जातो.

गोंधळातील गाणी ही देवीच्या पराक्रमाचे आणि तिच्या विविध रूपांचे वर्णन करतात. या परंपरेतून देवीवरील श्रद्धा आणि भक्ती अधिक दृढ होते.

गोंधळामुळे कुटुंबाला आणि समाजाला सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी लोकांची धारणा आहे.

ही महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक ओळख आहे. नवरात्रीत मनातला गोंधळ दूर सारून देवीची उपासना करण्यासाठी गोंधळ घातला जातो. 

नवरात्रीत लोक अनवाणी का चालतात?

Click Here

हा केवळ विधी नसून, देवीच्या उपासनेचा एक कलात्मक जागर आहे, म्हणून महाराष्ट्रात अनेक घरात हा कुलाचार म्हणूनही केला जातो.