‘श्री स्वामी समर्थ’ याचा नेमका अर्थ काय?

दररोज भाविक ‘श्री स्वामी समर्थ’ या नाममंत्राचा सतत जप करत असतात.

षडाक्षरी स्वामी नाम 'श्री स्वामी समर्थ' हा ब्रह्मांडनायक अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे.

'श्री स्वामी समर्थ' हा सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ समजून घेऊया...

श्री - स्वयं श्रीपदाविराजीत सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज...!

स्वामी - स्वाः + मी स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा आहे. 

मी म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईच्छ्या...! अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा.

समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा...! 

'श्री स्वामी समर्थ' म्हणजे श्रीपदविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करुन स्वयंभु शिव तत्व सद्गुरुकृपे अंकित करा.

।। श्री स्वामी समर्थ ।।

Click Here