गेले तीन दिवस काशीविश्वनाथ मंदिराच्या कळसावर पांढरे घुबड दिसत आहे, त्यावरून भारताचे भविष्य वर्तवले जात आहे; पण घुबड हा गूढ पक्षी आहे.
घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन आहे असे आपण म्हणतो. काही जण म्हणतात त्याच्या दर्शनाने शुभ वार्ता कळतात, धनलाभ होतो, तर काही त्याला अशुभ मानतात.
रहस्यमय असलेला हा पक्षी महालक्ष्मीचं वाहन अगदीच शोभून दिसतो. क्षणात कधी उडून जाईल कळणारही नाही. जशी लक्ष्मी चंचल, तसे तिचे वाहनही!
ह्यांची ऐकण्याची, पाहण्याची आणि आवाज करण्याची क्षमता आपल्या कल्पनेपेक्षाही कितीतरी जास्त असते. या गुणांमुळेच लक्ष्मीने हे वाहन निवडले असावे.
त्यामुळे त्याचे दर्शन शुभ की अशुभ यापेक्षा त्याचे गुण दोष लक्षात घेऊन त्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
हे कोणालाच घाबरत नाही. उलटपक्षी ह्याच्याच हल्ल्यात इतर पक्षी स्वतःची घरटी सोडून घाबरून पळून जातात.. अपवाद फक्त पक्षीराज गरुड.
ज्या प्रमाणे ह्याचं चालणं रुबाबदार आणि शांत त्याचप्रमाणे ह्याचं उडणं सुद्धा अतिशय शांत आणि जबरदस्त असतं. इतकं, की उडतांना आवाज करत नाही.
अगदी आरामात कोणत्याही पक्षाच्या घरट्यावर हल्ला करून तिथून आपली शिकार उचलून क्षणार्धात उडून जाणं कोणालाही धस्सं करू शकतं.
घुबडाचा हल्ला एखाद्या कुत्रं चावल्याएव्हढाच वाईट असू शकतो. कारण तो इतका वेगवान असतो की काय झालंय हे कळायला सुद्धा वेळ लागतो.
घुबडाची पिल्लं कधी जमिनीवर दिसली तर त्यांच्या जास्त जवळ जाऊ नका, वरुन कुठून तरी घुबडं लक्ष ठेवून असतात.
घुबडाच्या हल्ल्यात माणसं मरत नाहीत, त्यामुळे उगाच जास्त घाबरून त्यांच्यावर प्रतिहल्ला करू नका किंवा त्यांना मारून नका तर फक्त दुसरीकडे पळून जा.
थोडक्यात काय गैरसमजांपोटी घुबडांना घाबरून जाऊ नका, त्यांच्या शिकारी करू नका.