ऑगस्टमध्ये एकदा नाहीतर दोनदा जुळून येत आहे राजयोगाची संधी, ज्यामुळे पुढील राशींवर होणार आहे लक्ष्मीचीकृपा!
ज्योतिषांच्या मते ऑगस्ट मध्ये अनेक ग्रहांचे स्थलांतर शुभ संकेत घेऊन येत आहे.
या महिन्यात गजलक्ष्मी राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण होणार आहेत.
महिन्याच्या सुरुवातीला गुरु आणि शुक्र मिथुन राशीत गजलक्ष्मी राजयोग तयार करतील, जो २० ऑगस्ट पर्यंत कार्यशील राहील.
२१ ऑगस्ट पासून शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग सुरु होईल.
या राजयोगाचा पुढील राशींवर चांगला प्रभाव पडेल असे भाकीत वर्तवले जात आहे, त्या नशीबवान राशी कोणत्या ते पाहू.
मिथुन : गजलक्ष्मी राजयोग मिथुन राशीत होणार असल्याने या राशीच्या लोकांना व्यापार, व्यवसायात आर्थिक लाभ होईल, संपत्ती वाढेल.
तसेच कुटुंबसौख्य लाभेल, प्रवास योग येईल, नवीन ओळखीतून आर्थिक वाढ होण्याच्या दृष्टीने संधी मिळेल.
कर्क : लक्ष्मी नारायण राजयोगाचा कर्क राशीला खूप लाभ होईल. धन, धान्य, पैसा, प्रसिद्धीत वाढ होईल.
मानसिक तणाव कमी होईल, अडलेले पैसे सुटतील, कुटुंबात आनंददायी घटना घडतील.
तूळ : या दोन्ही राजयोगाचा शुभ परिणाम तूळ राशीलाही मिळेल. आवक वाढेल, आर्थिक स्थिती सुधारेल, मन प्रसन्न होईल.
याबरोबरच जुने मित्र किंवा नातेवाईक भेटल्याने आनंदी व्हाल, तब्येत सुधारेल, हा काळ इच्छापूर्तीचा ठरेल.