९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, त्यादिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते, त्याबरोबरच देवराखीही बांधायची असते, पण कोणाला ते जाणून घ्या!
बाजारात अनेक रंगीबेरंगी राख्यांमध्ये गोंड्याच्या छोट्या राख्या मिळतात, तिला देवराखी म्हणतात; देवाबरोबरच ती आणखी कोणाला बांधावी ते पहा.
पुढील पाच देवांना आणि वस्तूंना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधणं अनिवार्य असतं. त्यामागील कारणही जाणून घ्या.
गणपती : बुद्धिदात्या गणपतीला प्रत्येक ठिकाणी पहिला मान, म्हणून गणपतीला राखी बांधा.
बाळकृष्ण : द्रौपदीच्या पाठीशी जसा सदैव उभा राहिला तसा प्रत्येक बहिणीच्या पाठीशी कृष्ण उभा राहावा म्हणून त्याला राखी बांधावी.
हनुमान : हनुमानाला संरक्षण कवच म्हणतात, तो आपल्या मदतीला धावून यावा, त्याने भक्ती, युक्ती, शक्तीचे वरदान द्यावे म्हणून त्यालाही राखी बांधावी.
स्वामी समर्थ : आपली गुरुमाऊली आपल्या रक्षणार्थ सदैव धावून यावी म्हणून आपल्या गुरुंना तसेच स्वामी समर्थांना राखी बांधावी.
विष्णू तथा महादेव : शैव, वैष्णव बांधव आपल्या उपास्य देवतेला अर्थात महादेवाला तसेच विष्णूंना आपले रक्षक म्हणून राखी बांधतात.
याबरोबरच आपल्या घरातले कपाट, मुख्य द्वार, कॉम्प्युटर, आपले पाळीव प्राणी आणि मुख्यतः निसर्ग या वस्तूंनाही राखी बांधावी.
कारण, या वस्तू आपले रक्षण करतात आणि निसर्गाचे आपण रक्षण करायचे आहे, यासाठी देवराखी अवश्य बांधावी आणि जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे.