पितृपक्षात कावळ्याला मोठा मान, पण त्याच्या येण्याने केवळ पितर संतुष्ट असल्याची वर्दी मिळते असे नाही तर पुढील शुभ संकेतही कळतात.
कावळ्याची काव काव आपल्याला नकोशी वाटते, पण ज्ञानेश्वर माउलींनी त्यात शुभ शकुन शोधला आहे.
आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आणि घटना घडत असतात ज्या चांगल्या आणि वाईट गोष्टींचे संकेत दर्शवतात.
जर कावळा चोचीने माती खरडताना दिसला तर समजा तुम्हाला कुठूनतरी खूप पैसा मिळणार आहे. हे चिन्ह खूप शुभ मानले जाते.
कावळ्याची दीर्घकाळ काव काव पाहुण्यांच्या आगमनाचे लक्षण आहे, तसेच हा कार्यक्रम मान-सन्मान आणि पैसा मिळण्याचेही लक्षण आहे.
तुम्ही काम करत असताना एखादा कावळा काव काव करून लक्ष वेधून घेत असला तर ते समस्येतून मुक्त होण्याचे लक्षण आहे.
आपल्या नेहमीच्या वाटेवर कावळे पाणी पिताना दिसले तर ते धनलाभाचे स्पष्ट लक्षण आहे.
पितृपक्षाचा नैवेद्य खाऊन झाल्यावरही कावळा शांतपणे बसून राहत असेल तर तुमचे पितर तुमच्यावर संतुष्ट आहेत.
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल