आत्म्याला शस्त्राने छेदता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही...
तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे. त्याच्या फळांवर नाही; म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको. कर्म करत राहा, फळाची चिंता नको.
आत्म्याला शस्त्राने छेदता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही, पाण्याने ओल करता येत नाही, वाऱ्याने वाळवता येत नाही. आत्मा शाश्वत आहे.
युद्धात वीरगती मिळाली तर स्वर्ग मिळेल, विजयी झालात तर पृथ्वीवर सुख मिळेल. त्यामुळे निर्णय घेऊन कर्म करत रहा.
जेव्हा जेव्हा धर्माचा लोप होत असेल, अधर्माची वाढ होत असेल; तेव्हा मी स्वत: पृथ्वीवर अवतीर्ण होतो.
सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा नाश करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेतो.
विषयांचा अखंड विचार करणारा मनुष्य त्यांच्या आकर्षणात अडकतो, त्यातून कामना जन्म घेते व कामनांमध्ये विघ्न आल्यावर क्रोध उत्पन्न होतो.
क्रोधामुळे भ्रम निर्माण होतो, भ्रमित झाल्यावर स्मृती नष्ट होते; स्मृती गेल्यावर बुद्धी नष्ट होते, बुद्धी नाहीशी झाली की मनुष्यचं जीवन संपतं.
श्रेष्ठ पुरुष जे करत असतात, तेच सामान्य लोकही करतात. ज्याचा जो आदर्श असतो, समस्त मानव त्याचे अनुसरण करतात.
श्रद्धा असणारा, संयमी, एकाग्र मनाचा माणूस ज्ञान प्राप्त करतो आणि त्याद्वारे परमशांती प्राप्त करतो.
सर्व धर्म त्यागून, माझ्या शरण ये; मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, शोक करू नकोस.