श्रीमंतांच्या हातावर असतात 'या' खुणा 

ज्या लोकांच्या हाताच्या तळव्यावर असतात 'या' खुणा, ते उपभोगतात श्रीमंती; तुमचाही हात तुम्ही तपासून बघा. 

अनेकदा असेही होते, की काही भाग्यरेषा आता दिसत नाही पण कालपरत्त्वे त्या ठळकपणे दिसू लागतात. 

एक भाग्यरेषा जी तुमच्या तळहातापासून ते मधल्या बोटापर्यंत सरळ जाते ती तुमच्या करिअरमधील यश आणि आयुष्यात येणारे स्थैर्य दर्शवते. 

ही रेषा कुठेही न दुभंगता शनी पर्वत पार करून सूर्य रेषेला जाऊन मिळत असेल तर जबरदस्त भाग्य आणि आर्थिक सुबत्तेचे स्पष्ट चित्र दर्शवते. 

तुमच्या हाताचा तळवा गुलाबी रंगाचा असेल तर अशा व्यक्तीला अर्थार्जनाच्या अनेक संधी मिळतात आणि समाजात मान मरातब मिळतो. 

गुरु पर्वत हा तळहातावर तर्जनीच्या खाली असतो, त्या भागावर उंचवटा असेल, गुलाबी आणि स्पष्ट दिसत असेल तर निर्णयक्षमता आणि नेतृत्त्व  उत्तम असते. 

जर तुमच्या तर्जनीखाली गुरु पर्वतावर फुली असेल तर हे शुभ लक्षण मानले जाते. अध्यात्मिक विकास, भाग्योदय आणि चांगल्या नेतृत्त्वाची ती खूण आहे. 

अंगठ्याच्या पेराजवळ असलेले गोलाकार चिन्ह संकटातून बाहेर पडण्याची क्षमता दर्शवते. 

तर्जनीच्या खाली गुरु पर्वतावर स्वस्तिक चिन्ह असेल तर ती व्यक्ती राजयोग उपभोगते आणि तिच्यावर गुरुकृपा राहते. उच्च पद, प्रतिष्ठा मिळते. 

लांबसडक बोटं असणारी व्यक्ती बुद्धिमान, कार्यकुलशील आणि परफेक्शनिस्ट असते. 

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

Click Here