दुसऱ्यांचे यश पाहून दुःखी होऊ नका आणि स्वतःला यश मिळाले म्हणून हुरळून जाऊ नका, वाचा श्री. श्री. रविशंकर यांनी सांगितलेली यशाची व्याख्या!
गुरुदेव सांगतात, आजची तरुण पिढी महत्त्वाकांक्षा आणि अंतर्गत अस्थिरतेच्या वळणावर उभी आहे, त्यांना यशस्वी कोणाला म्हणावे हेच कळत नाही.
१. “यश कशात मोजावं? तर चेहऱ्यावरून न हरवलेलं हास्य, उत्साह, थकवा न आणणारी ऊर्जा, नवनवे चांगले काम करण्याची उमेद यात मोजावं.
२. यश ही एक वृत्ती आहे, एखादी घटना नाही. त्यामुळे एखाद्या प्रसंगाने मोहरून जात त्याला यश म्हणू नका.
३. मोठमोठ्या घोषणा करून नव्हे, तर उद्दिष्टातील प्रामाणिकतेने खरे यश मिळते. जे लोकांना सांगण्यासाठी नाही तर स्वतः अनुभवण्यासाठी असते.
४. उत्साहाने केलेली गोष्ट मानसिक समाधान देणारी असते. त्यात यश मिळो न मिळो, समाधान नक्की मिळते आणि ते तुमच्यापुरते का होईना यश असते.
५. तुमच्याकडे अमर्याद सामर्थ्य आहे. थोड्याथोडक्या यशाने हुरळून जाऊ नका, यशाचा एक एक टप्पा सर करत राहा.
६. यश मिळवण्यासाठी तुम्हाला नशिबाची साथ लागते आणि प्रयत्नसुद्धा; त्यामुळे प्रयत्न आणि उपासना दोन्ही सुरु ठेवा.
७. यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो, अथक मेहनत घ्यावी लागते, मगच यश मिळते.
८. यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्ट कट कामी येत नाही, कारण त्यातून मिळालेले यश क्षणिक असते, कायमस्वरूपी नाही.
९. अयशस्वी झालात तरी हरकत नाही, आत्मविश्वास गमावू नका, कारण तोच तुम्हाला पुन्हा यशाच्या वाटेवर नेणार आहे हे लक्षात ठेवा.
१०. भौगोलिक सुखात यश शोधू नका, अध्यात्मिक यश महत्त्वाचे असते, ते तुम्हाला आंतरिक समाधान देते, ते मिळवण्याचा प्रयत्न करा.