२०२५ मध्ये श्रावण महिन्यात ४ सोमवार आहेत. राशीनुसार नेमके काय करावे? जाणून घ्या...
श्रावण सुरू झाला आहे. शिव पूजन, उपासनेसाठी श्रावण सर्वोत्तम मानला जातो. श्रावणी सोमवारी राशीनुसार उपाय करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते.
मेष: ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. पांढरे फूल अर्पण करावे.
वृषभ: ‘ॐ सोमेश्वराय नमः’ या मंत्राचा जप करावा. दही आणि साखर अर्पण करणे शुभ मानले जाते.
मिथुन: ‘ॐ नागेश्वराय नमः’ या मंत्राचा जप करावा. बेलपत्र अर्पण करणे लाभदायक ठरते.
कर्क: ‘ॐ शिवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास उपास करावा.
सिंह: ‘ॐ त्र्यंबकेश्वर नमः’ या मंत्राचा जप करावा. लाल फूल अर्पण करावे.
कन्या: ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. धतुरा आणि मध अर्पण करणे शुभ मानले जाते.
तूळ: ‘ॐ महाशिवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. गरजू लोकांना अन्नदान करणे शुभ मानले जाते.
वृश्चिक: ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष अर्पण करणे लाभदायक ठरते.
धनु: ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. पिवळे फूल, पिवळे पेढे-मिठाई अर्पण करणे लाभदायक ठरेल.
मकर: ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. शमीपत्र अर्पण करावे.
कुंभ: ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. गरजूंना मदत करावी.
मीन: ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा. केळीचे दान करणे शुभ मानले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके, ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.