साडेसाती आहे? ५ श्रावण शनिवारी ‘हे’ कराच

यंदा श्रावणात ५ शनिवार असून, साडेसाती असलेल्यांनी काही गोष्टी करणे हिताचे ठरू शकेल.

चातुर्मासातील श्रावण सुरू झाला आहे. यंदा श्रावणात ५ शनिवार आहेत. साडेसाती सुरू आहे, या शनिवारी काही उपाय करावेत, असे म्हटले जाते.

आताच्या घडीला कुंभ, मीन, मेष या राशींची साडेसाती आहे. शिवपूजेसाठी श्रावण सर्वोत्तम मानला जातो. शनि महादेवांना गुरू मानतो. 

शनि साडेसाती, ढिय्या प्रभाव, शनि महादशा काळात शक्य तेवढी महादेवांची उपासना, नामस्मरण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ मानले जाते.

साडेसातीत आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे. 

शनि साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.

कुंडलीत शनि कमकुवत असेल, प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शनिवारी विशेष व्रत करावे. शनि संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे.

शनिवारी शनि मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा. शनि उपासना, शनि स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनि चालीसा पठण करावे.

हनुमंताचे दर्शन घ्यावे, मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.

पिंपळाच्या झाडाशी दूध-पाणी मिसळून दर शनिवारी अर्पण करावे. पिंपळ पूजन करावे.  दिवा लावावा, शनिच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण, दान करावे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

श्रावण: राशीनुसार धारण करा शुभ रुद्राक्ष

Click Here