श्रावणी सोमवारनिमित्त केला रुद्राभिषेक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात.
अमृता फडणवीस नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात.
नुकतचं त्यांनी काल श्रावणी सोमवारी भगवान शंकराचा रुद्राभिषेक केला.
रुद्राभिषेक करतानाचे काही फोटो अमृता यांनी पोस्ट केलेत.
या फोटोंना "रुद्राभिषेक हर हर महादेव !" असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
या फोटोंमध्ये अमृता यांनी केशरी आणि हिरव्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला आहे.
श्रावण महिन्यातील सोमवार (Shravani Somavar) हे अत्यंत पवित्र मानले जातात.
अमृता या महादेवाच्या खूप मोठ्या भक्त आहेत.