गुरुदेव श्री श्री रविशंकर सांगत आहेत, मन शांत, आनंदी आणि समाधानी ठेवण्याचा मार्ग तोही रोजच्या आहारातून!
जेव्हा सत्त्वगुण प्रबळ असतो, तेव्हा संतुलन, सजगता, ज्ञान, रस, समाधान आणि प्रत्येक गोष्टीत आनंद अनुभवता येतो.
जेव्हा रजोगुण प्रबळ होतो, तेव्हा अधिक इच्छा, स्वार्थ, अस्वस्थता वाढते ज्याचे पर्यवसान दुःखात होते.
जेव्हा तमोगुण प्रबळ होतो, तेव्हा भ्रम, आसक्ती, अज्ञान आणि आळस निर्माण होतो.
चुकीचे अन्न, अपुरी झोप आणि अतिउत्तेजना मनाला अस्वस्थ करतात.
क्रियाशीलता आणि विश्रांती हे जीवनातील दोन अत्यावश्यक पैलू आहेत. त्यामध्ये संतुलन साधणे हेच मुळी एक कौशल्य आहे.
अन्नाचा मनावर मोठा परिणाम होतो. ताजे, सात्त्विक अन्न विचारात स्पष्टता आणि स्वभावात सहजता आणते.
जेव्हा मन अस्वस्थ असते, तेव्हा काहीही आनंददायी वाटत नाही. मग काय करावे? तर आपल्या आत डोकावून बघावे.
प्रत्येक भावना श्वासाशी जोडलेली असते. तुम्ही श्वास बदलला, त्याची लय बदलली तर तुम्ही भावनेत बदल करु शकता.
श्वासाद्वारे तुम्ही मनाला खूप लवकर शांत करू शकता, आणि तुम्ही हे कुठेही, कधीही करू शकता.
जेव्हा मन काही क्रियेत गुंतलेले असते, तेव्हा ते थकते. ध्यान म्हणजे असे काहीतरी जे तुम्हाला थकवत नाही, तर विश्रांती देते.
विश्रांती ही फक्त झोपेत नसते. ध्यानामुळे लाभणारी विश्रांती ही तुम्हाला लागलेल्या सर्वात गाढ झोपेपेक्षा अधिक परिणामकारक असते.
कसलीही चलबिचल नसलेले मन म्हणजे ध्यान. वर्तमान क्षणात असलेले मन म्हणजे ध्यान. ज्यात कसलाही संकोच आणि अपेक्षा नाही असे मन म्हणजे ध्यान.
सुरुवातीला तुम्हाला ध्यान खूप कंटाळवाणे वाटू शकते, पण नंतर तुम्हाला ते इतके आवडेल की तुम्ही त्यात रमून जाल.
गुरुदेव श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून लाखो लोकांना अस्वस्थतेतून मनःशांती आणि स्पष्टतेकडे नेत आहेत, तुम्हीही सामील व्हा!