ओशो रजनीश यांचे १० प्रसिद्ध अन् आयुष्य बदलवून टाकणारे कोट्स

पूजा करण्याचा कोणता नियम नाहीये. ज्याचं मन निर्दोष...

साधेपणा खूप सुंदर असतो. जी गोष्ट साधी असते ती नेहमी सत्याच्या जवळ असते. 

खूप विचार करणं ही एक नकारात्मक कला आहे. त्यामुळे ज्या वास्तवात नाहीत त्या समस्यांची देखील निर्मिती होते. 

परमेश्वर शब्दांची भाषा समजत नाहीत. कारण शब्दाची निर्मिती ही मानुष्यानं केली आहे. शब्द आपल्यासाठी तयार झाले आहेत. ईश्वर मौनाची भाषा समजतो. मौन म्हणजेच ध्यान, समाधी आणि आत्मज्ञान!

आता अशा ठिकाणी पोहोचलो आहोत जिथं नद्या मृत्यूशय्येवर आहेत. अन् नाल्यांना पूर आलाय!

मनात फक्त असा विचार येऊ दे जो तुम्हाला सत्यात उतरवायचा आहे. कारण विचार हे एक बीज आहे आणि होणारी घटना ही त्याचं फळ!

मनुष्य मृतदेह, अस्थीं, राख पुजतोय अन् जीवंत लोकांचा तिरस्कार करतोय. मनुष्य अद्भुत आहे. 

पूजा करण्याचा कोणता नियम नाहीये. ज्याचं मन निर्दोष, पवित्र आणि प्रामाणिक आहे भगवान त्या सर्वांचं ऐकतो. 

धाडसी लोकच मला ऐकण्याची हिम्मत करतील कारण मला ऐकणं हे धोकादायक आहे.

लोकं पुण्य देखील त्या वयात करतात ज्या वयात ते कोणते पाप करण्याच्या लायकीचे रहात नाहीत. 

मंदिरात गेला नाही म्हणून देवाचा अनादर होत नाही. मात्र मंदिरात जाऊन देखील तुम्ही संसारिक वस्तू मागितल्या अन् सर्व मागण्या संपून जातील असं काही न मागता आला तर अनादर होतो. 

Click Here