'हा' एक मंत्र जीवनाला देईल नवा आकार 

जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या दूर होण्यासाठी आपण स्तोत्र मंत्राच्या शोधात असतो, असाच एक मंत्र जो तुमचे आयुष्य बदलू शकतो, रोज ५ मिनिटं म्हणा. 

"ॐ" हाच तो मंत्र आहे, ज्यामुळे तुमची एक नाही तर अनेक प्रकारची दुखणी दूर होणार आहेत, कशी ते जाणून घ्या. 

"ॐ" चे उच्चारण केल्याने गळ्यात कंपन होण्यामुळे थायरॉइडचा त्रास दूर होतो.

"ॐ" च्या जपाने जीव घाबरणे दूर होते.

"ॐ" चा जप केल्याने शरीरात रक्त प्रवाह योग्यरितीने होऊ लागतो

"ॐ" चा जप केल्याने रक्तदाब सामान्य होतो आणि ह्रदय विकाराच्या झटक्या पासून बचाव होतो.

"ॐ" चा जप केल्याने पोटात कंपन होते आणि पचन शक्ति मजबूत होते.

"ॐ" चा जप केल्याने फुफ्फुसांना अधिक प्राणवायू मिळतो आणि त्यामुळे उत्साहात वाढ होते.

"ॐ" चा जप केल्याने थकवा दूर होतो आणि ताजेपणाचा अनुभव होतो.

"ॐ" चे उच्चारण झोपण्यापूर्वी केल्याने झोप लगेच आणि शांत लागते.

"ॐ" चा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणावापासून कायमची मुक्ती मिळते.

"ॐ" चा जप केल्याने पाठीच्या कण्यात कंपन होते आणि त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होऊन कमरेचा त्रास दूर होतो.

"ॐ" चा उच्चार केल्याने मेंदूत कंपन होते आणि त्यामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते.

"ॐ" चे उच्चारण अथवा जप केल्याने आपण खूप सगळे विकार दूर करू शकतो.

Click Here