आज राशीनुसार 'अशी' करा स्वामीउपासना 

आज श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी. स्वामींची कृपा मिळवण्यासाठी राशीनुसार विशिष्ट सेवा केल्यास त्याचे फळ अधिक लवकर मिळते. चला तर जाणून घेऊया! 

मेष राशीच्या जातकांनी आज स्वामींना लाल फुले अर्पण करावीत आणि १०८ वेळा 'श्री स्वामी समर्थ' मंत्राचा जप करावा. यामुळे तुमचा उत्साह वाढेल. 

वृषभ राशीच्या व्यक्तींनी स्वामींना पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामुळे आयुष्यात सुख-शांती आणि स्थिरता लाभेल.

मिथुन राशीच्या जातकांनी स्वामींसमोर हिरवे मूग ठेवावेत आणि 'स्वामी चरित्र सारामृत' मधील अध्याय वाचावेत. व्यवसायात प्रगती होईल. 

कर्क राशीच्या व्यक्तींनी स्वामींना दुधाचा नैवेद्य दाखवून पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा. यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. 

सिंह राशीच्या जातकांनी स्वामींना केशरी गंध लावून गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. 

कन्या राशीच्या व्यक्तींनी स्वामींना हिरवे वस्त्र किंवा तुळशीची माळ अर्पण करावी. तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. 

तूळ राशीच्या जातकांनी स्वामींसमोर तूप आणि कापूर लावून आरती करावी. आर्थिक ओघ वाढण्यास मदत होईल. 

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी स्वामींना लाल गंध किंवा कुंकू अर्पण करावे. शत्रूंवर विजय मिळेल आणि संकटांपासून रक्षण होईल. 

धनु राशीच्या जातकांनी स्वामींना पिवळी फुले आणि हळद अर्पण करावी. शिक्षण आणि करिअरमध्ये मोठे यश मिळेल. 

मकर राशीच्या व्यक्तींनी स्वामींच्या चरणी काळे तीळ ठेवावेत आणि 'तारक मंत्राचा' ११ वेळा पाठ करावा. कामातील अडथळे दूर होतील. 

कुंभ राशीच्या जातकांनी गरिबांना अन्नदान किंवा निळे वस्त्र दान करावे. स्वामींच्या कृपेने नवीन संधी उपलब्ध होतील. 

मीन राशीच्या व्यक्तींनी स्वामींना केशरयुक्त दुध किंवा पिवळी मिठाई अर्पण करावी. आध्यात्मिक प्रगती आणि सुख-समृद्धी लाभेल. 

उपासना कोणतीही असो, ती मनापासून आणि श्रद्धेने केल्यास स्वामी नक्कीच पाठीशी उभे राहतात. "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!" 

Click Here