चातुर्मासातील दुसरा गुरुपुष्यामृत योग ऑगस्ट महिन्यात येत आहे.
चातुर्मास काळातील दुसरा गुरुपुष्यामृतयोग जुळून येत आहे. असा सलग गुरुपुष्यामृत योग जुळून येणे दुर्मिळ मानले जाते. गुरुवार, २१ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुपुष्यामृत योग आहे.
जुलै महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात गुरुपुष्यामृतयोग जुळून आला आहे. ऑगस्ट महिन्यातील हा योग दिवसभर असणार आहे. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे.
श्रावण महिन्याच्या प्रारंभी गुरुपुष्यामृतयोग जुळून आला होता. आता श्रावण महिन्याची सांगता होतानाही गुरुपुष्यामृत जुळून आला आहे.
गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे.
या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते.
या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते, असे सांगितले जाते.
गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र-तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे.
गुरुपुष्यामृतयोग वारंवार येत नाही. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा.
पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे.