श्रावण: राशीनुसार धारण करा शुभ रुद्राक्ष

तुमची रास कोणती? श्रावणात कोणता रुद्राक्ष धारण कराल? जाणून घ्या...

शंकराचे पूजन, उपासना यासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. श्रावणी सोमवारी आवर्जून रुद्राभिषेक, दुग्धाभिषेक केला जातो.

तसेच श्रावणात शिवाचे प्रतीक रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. राशीनुसार रुद्राक्ष धारण केला, तर त्याचा लाभ अनेक पटींनी मिळू शकतात, असे म्हटले जाते.

रुद्राक्षाला अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. रुद्राक्षांचे अनेक प्रकार आहेत. कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणते रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते? 

मेष: मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याचे मानले गेले आहे. मेष राशीच्या व्यक्तींना तीनमुखी रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला जातो. 

वृषभ: वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याचे मानले जाते. वृषभ राशीच्या व्यक्तींनी सहामुखी रुद्राक्ष धारण करावे, असा सल्ला दिला जातो. 

मिथुन: मिथुन राशीचा स्वामी बुध मानला गेला आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी चारमुखी रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला दिला जातो. 

कर्क: कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याचे मानले जाते. कर्क राशीच्या व्यक्तींनी दोनमुखी रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला दिला जातो.

सिंह: सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्याचे मानले जाते. सिंह राशीच्या व्यक्तींनी बारामुखी रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला दिला जातो.

कन्या: कन्या राशीचा स्वामी बुध मानला गेला आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनी चारमुखी रुद्राक्ष धारण करावा, असे सांगितले जाते.

तूळ: तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्याचे मानले जाते. तूळ राशीच्या व्यक्तींनी सहामुखी रुद्राक्ष धारण करावा, असा सल्ला दिला जातो.

वृश्चिक: वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्याचे मानले जाते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी तीनमुखी रुद्राक्ष धारण करावा, असा सल्ला दिला जातो.

धनु: धनु राशीचा स्वामी गुरु असल्याचे मानले गेले आहे. धनु राशीच्या व्यक्तींनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा, असा सल्ला दिला जातो. 

मकर: मकर राशीचा स्वामी शनी असल्याचे मानले गेले आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी सातमुखी रुद्राक्ष धारण करावा, असा सल्ला दिला जातो. 

कुंभ: कुंभ राशीचा स्वामी शनी असल्याचे मानले जाते. कुंभ राशीच्या व्यक्तींनी सातमुखी रुद्राक्ष धारण करावे, असा सल्ला दिला जातो.

मीन: मीन राशीचा स्वामी गुरु असल्याचे मानले गेले आहे. मीन राशीच्या व्यक्तींनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा, असा सल्ला दिला जातो. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

३३ कोटी देव आहेत! तुम्हाला किती माहिती?

Click Here