महाभारतात पांडवांना विजय मिळवून देणारे श्रीकृष्ण किती वर्ष जगले?
१५ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. गोकुळ, राधा, बाललीला, महाभारत, भगवद्गीता याशिवाय श्रीकृष्णांचे चरित्र पूर्ण होत नाही.
गीतेचे तत्त्वज्ञान समजून घेताना उभे आयुष्य कमी पडते असा याचा महिमा. महाभारत युद्ध तब्बल अठरा दिवस चालले.
हातात शस्त्र न घेताही मुसद्देगिरी आणि नेमक्या धोरणांनी पांडवांना महाभारताच्या विजयश्रीपर्यंत श्रीकृष्णांनी नेले.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाभारत युद्धावेळी श्रीकृष्णांचे वय किती होते? एकूण किती वर्ष श्रीकृष्ण जगले?
एकूण १८ दिवसांनी घनघोर महाभारत युद्ध संपले. महाभारत युद्धानंतर कौरवांकडून ३, पांडवांकडून १५ असे एकूण १८ योद्धे जिवंत राहिले होते.
कौरवांचे कृतवर्मा, कृपाचार्य, अश्वत्थामा; पांडवांचे युयुत्सु, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, कृष्ण, सात्यकी जिवंत राहिले.
युयुत्सु हा कौरव पांडवांच्या बाजूने लढल्यामुळे तो एकच कौरव म्हणून जिवंत राहिला. बाकी सर्व कौरव युद्धात मारले गेले.
एक उत्तम व्यवस्थापक, नियोजनकर्ता, धोरणी अशा अनेक भूमिका श्रीकृष्णांनी महाभारत युद्धावेळी अगदी चोख बजावल्या.
महाभारताचे महानायक श्रीकृष्ण महाभारत युद्ध झाले, त्यावेळी ८९ वर्षांचे होते, असे एक संशोधन सांगते.
महाभारत युद्धाच्या तब्बल ३६ वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या १२५ व्या वर्षी श्रीकृष्णांनी अवतार कार्याची सांगता केली.
भगवान श्रीकृष्ण द्वापार युगाचा अंत आणि कलियुगाची सुरुवात यांच्या संधिकालात विद्यमान होते.
सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.