भावाच्या मनगटाला शोभून दिसेल अशा राखीची बहीण निवड करते, अशातच रुद्राक्ष राखीलाही अनेकींची पसंती असते, पण ते शास्त्रमान्य आहे का?
श्रावणात महादेवाची उपासना केली जाते, रुद्राक्ष हे महादेवाचे स्वरूप मानले जाते, त्यामुळे रुद्राक्षाचे महत्त्व वाढते.
याच श्रावण पौर्णिमेला येणारा सण म्हणजे रक्षाबंधन, या दिवशी भावाला प्रेमाचा, संरक्षणाचा, आशीर्वादाचा धागा राखीस्वरूपात बांधला जातो.
बाजारात येणाऱ्या सुंदर, नवनवीन प्रकारच्या राख्यांमध्ये रुद्राक्षाची राखीही आढळते. पण ती राखी बांधणे योग्य ठरते का?
मुळात रुद्राक्ष कोणी धारण करावा? ज्या व्यक्तीला ग्रहदशेनुसार एकमुखी, द्विमुखी, पंचमुखी, षण्मुखी, अष्टमुखी, चतुर्दशमुखी रुद्राक्ष घाला असे सांगितले जाते.
रुद्राक्षाची माळ वापरणारी व्यक्ती अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती असावी लागते.
रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी मांसाहार, मद्यपान करून चालत नाही, त्यांना सात्विक आहार आणि साधी जीवनशैली अनुसरावी लागते.
तसेच रुद्राक्ष धारण करणारी व्यक्ती त्याच्या प्रभावामुळे संसार सुखातून अलिप्त होऊन महादेवासारखी विरक्त जीवन जगू लागते.
म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाला अनुकूल असेल तरच रुद्राक्ष धारण करावे अन्यथा त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
अस्वस्थता वाढते, रक्तादाब कमी होतो, मेंदू अस्थिर होतो, म्हणून ज्योतिषांचा सल्ला घेतल्याशिवाय तो धारण करू नये. आणि म्हणूनच...
रक्षाबंधनाला रुद्राक्ष असलेली राखी भावाला बांधू नये आणि बांधायची असल्यास ज्योतिषांचा सल्ला घ्यावा.