वास्तूची दृष्ट कधी आणि कशी काढावी?

व्यक्तीची दृष्ट काढतात ते माहीत आहे, पण वास्तूचीही दृष्ट काढतात हे वाचून आश्चर्य वाटले? मग सविस्तर वाचाच!

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्तींचा प्रभाव असतो. 

घरात सकारात्मकता यावी आणि घरातील नकारात्मकता दूर व्हावी म्हणून घराची दृष्ट काढली जाते. 

दृष्ट काढणे हा श्रद्धेचा भाग आहे, त्यासाठी फुलांचा, पाण्याचा किंवा मीठ-मोहरीचा वापर केला जातो. 

वास्तुदोष निवारणासाठी मोहरीचा वापर कसा करून घेता येईल, एकार्थी घराची दृष्ट कशी काढता येईल ते पाहू. 

जेणेकरून घरातील सदस्यांचे आरोग्य तर चांगले राहीलच, शिवाय आर्थिक स्थिती देखील डगमगणार नाही. 

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवणे शुभ मानले जाते. रोज संध्याकाळी दाराजवळ चमचाभर काळी मोहरी ठेवावी. 

लाल मोहरी सूर्याशी संबंधित मानली जाते, तर  काळी मोहरी शनिशी संबंधित मानली जाते.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा वास्तूच्या पूर्व दिशेला खिडकी असल्यास तिथे, चमचाभर लाल मोहरी ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा होते 

तर प्रवेश द्वाराजवळ काळी मोहरी ठेवल्याने शनिदोषापासून आराम मिळतो. घरातील आर्थिक स्थितीच्या आड येणारे दोष दूर होतात. 

( सदर माहिती वास्तू शास्त्रातील प्राथमिक तोडग्यांच्या आधारावर दिलेली आहे. )

Click Here