कपडे रात्री बाहेर ठेवू नयेत; कारण... 

काही जुन्या समजुती, प्रथा परंपरेने चालत आल्या, त्यामागे असलेली कारणं आणि लॉजिक जाणून घेऊया. 

गॅस बंद असताना त्यावर तवा, कढई ठेवू नये, अग्नीला आस लागते. काम झाले की ओटा आवरून ठेवावा! लॉजिक: पसारा वेळीच आवरला जातो. 

जुना तवा, कढई कोणाला देऊ नये, त्यामुळे आपली कमाई लोकांबरोबर वाटली जाते. लॉजिक : जुन्या वस्तू वापरण्यायोग्य नसतील तर देऊन फायदा नसतो. 

कणिक रात्री मळून फ्रिज मध्ये ठेवू नये, त्यामुळे अन्नपूर्णा नाराज होते. लॉजिक : ताज्या कणकेच्या तुलनेत जुन्या कणकेत पोषणमूल्य कमी होतात. 

सूर्यास्तानंतर कोणालाही दही देऊ नये, केलेली उपासना वाया जाते.  लॉजिक : सूर्यास्तानंतर फळं, आंबट पदार्थ खाऊ नये, प्रकृती बिघडते. 

वापरून झालेले पोळपाट लाटणे खूप वेळ न धुता ठेवू नये, घरच्यांची भूक मरते. लॉजिक : ओल्या पोळपाटाला कीड लागून अन्नपदार्थ आणि प्रकृती बिघडू शकते. 

रात्री बाहेर कपडे वाळत टाकू नये, नकारात्मक शक्ती आकर्षिली जाते. लॉजिक : रात्री हवेत गारठा असतो, कपडे वाळत नाहीत.पूर्वी कपडे चोरीचीही भीती असे! 

संध्याकाळी झाडाखाली बसून खाऊ नये, रोगराई होते. लॉजिक: अंधारात खाल्याने सूक्ष्म जीव जिवाणू पोटात जाण्याची भीती असते. 

अतिथीला खाऊ पिऊ न घालता जाऊ देऊ नये, विष्णू-लक्ष्मी नाराज होते. लॉजिक : आदरातिथ्य केल्याने व्यक्ती सुखावते, न केल्याने दुखावते. 

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. 

Click Here