गुरुपुष्यामृत योगात स्वामींचा अत्यंत प्रभावी गुरुमंत्र म्हणाच.
गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते. २४ जुलै २०२५ च्या गुरुवारी गुरुपुष्यामृतयोग जुळून आला आहे.
गुरुपुष्यामृतयोग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्या दिवशी गुरुपुष्यामृतयोग असतो.
अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे.
गुरुपुष्य योगावर स्वामींचा गुरुमंत्र म्हणजेच तारक मंत्र अवश्य म्हणावा. तारक मंत्राचा यथाशक्ती जप करावा. अपार गुरुकृपा होऊन अमृत पुण्य संचय मिळवा.
निःशंक हो, निर्भय हो, मना रे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मर्तूगामी, अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविणा काळ ना नेई त्याला, परलोकही ना भीती तयाला ।।२।।
उगाची भीतोसी भय पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ।।३।।
खरा होई जागा तू श्रद्धेसहित, कसा होशी त्यावीण तू स्वामीभक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतातहे तीर्थ घे, आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ।।५।।
॥ श्री स्वामी समर्थ ॥ , ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥