२३ एप्रिल गुरुपुष्यामृत योग: राशीनुसार करा 'हे' सोपे उपाय आणि मिळवा सुख-समृद्धी! या दिवशी केलेली गुंतवणूक आणि उपासना अक्षय फळ देणारी ठरते.
मेष : हनुमान चालिसाचे पठण करा आणि लाल रंगाच्या वस्तूंचे (उदा. मसूर डाळ) दान करा. आर्थिक अडथळे दूर होतील.
वृषभ : श्रीसूक्ताचे पठण करा. पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ किंवा साखर दान करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल.
मिथुन : गणपती अथर्वशीर्ष वाचा. हिरव्या मुगाचे दान करा आणि शक्य असल्यास नवीन अभ्यासाची किंवा कौशल्याची सुरुवात करा.
कर्क : पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. शिवलीलामृत वाचा किंवा महादेवाला अभिषेक करा. मानिसक शांती लाभेल.
सिंह : सूर्याला अर्घ्य द्या आणि केशराचा टिळा लावा. सोन्याची किंवा तांब्याची वस्तू खरेदी करणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल.
कन्या : गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे दान करा. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे प्रगतीसाठी उत्तम ठरेल.
तूळ : लक्ष्मी देवीची उपासना करा. अत्तर किंवा पांढऱ्या सुती कापडाचे दान केल्यास वैवाहिक जीवनात गोडवा येईल.
वृश्चिक : गुळाचे दान करा. सुंदरकांड वाचा किंवा ऐका. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत होईल.
धनु : पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. चण्याची डाळ किंवा हळद दान करा. गुरुकृपा प्राप्त होण्याचा हा उत्तम काळ आहे.
मकर : शनि स्तोत्राचे पठण करा. काळ्या तीळाचे दान करा. कष्टाचे फळ मिळण्यासाठी हा मुहूर्त तुम्हाला साथ देईल.
कुंभ : पक्ष्यांना दाणे टाका. गरिबांना अन्नाचे दान करा. नवीन गुंतवणुकीसाठी हा दिवस तुमच्यासाठी वरदान ठरेल.
मीन : कुलदेवतेची आणि गुरूंची पूजा करा. पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा. आध्यात्मिक प्रगतीसाठी हा काळ उत्तम आहे.