लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस राहिले आहे.
बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी कोट्यवधींचे आराध्य असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. या दिवसापासून पुढे गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये गणरायाच्या उपासनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, गणेशाला विघ्नहर्ता म्हणूनही ओळखले जाते.
श्रीगणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना करताना काही नियम पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. वास्तुशास्त्रात याबाबत काही माहिती आढळून येते.
श्रीगणेशाची मूर्ती ही पूर्व, पश्चिम, ईशान्य कोन, पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेला असायला हवी. गणपतीची मूर्ती घराच्या दक्षिण दिशेला नसावी.
गणपतीची मूर्ती घरात आणताना ललितासनात बसलेल्या स्वरुपात असायला हवी. अशी मूर्ती शांततचे प्रतिक दर्शविते. याने घरात सुख-समृद्धी टिकते, असे म्हणतात.
गणपतीची सोंड शक्यतो डाव्या बाजूला झुकलेली असायला हवी. अशी गणपती मूर्ती यश आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते, असे म्हणतात.
गणपतीच्या डाव्या हातात मोदक असायला हवा. चरणाजवळ मूषक वाहन असायला हवे.
गणपती बाप्पाची मुद्रा प्रसन्न असायला हवी. गणपती स्वरुप पाहिले की मन अगदी आनंदी होऊन जाते. एक नवचैतन्य येते.
गणपतीच्या मूर्तीचा रंग हा पांढरा किंवा शेंदूर असायला हवा, असे म्हटले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.