श्रावणात काय करावे आणि काय टाळावे?

श्रावण मास महादेवाच्या उपासनेचा; या काळात धर्मशास्त्राने काही पथ्य आणि उपासना सांगितली आहे, त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. 

यंदा २५ जुलै ते २२ ऑगस्ट श्रावण मास असणार आहे. या काळात कांदा, लसूण, मांसाहार, मद्य टाळावे हे माहीत आहेच, त्याबरोबर इतरही नियम पाहू

उपास : श्रावणात एक वेळ भोजन करण्याचा काही लोकांचा संकल्प असतो, तर काही जण श्रावण सोमवार, गुरुवार, शनिवार या दिवशी उपास करतात. 

सात्त्विक भोजन : श्रावणात कांदा लसूण जेवणात न वापरल्याने इतरही मसालेदार पदार्थ आपोआप कमी होतात त्यामुळे सात्त्विक भोजन मिळते. 

स्वच्छता : श्रावणापाठोपाठ भाद्रपदात गणपती येणार असल्याने या काळात घराची स्वच्छता करण्यावरही भर दिला जातो. 

उपासना : श्रावणात महादेवाची उपासना केली जाते, ओम नमः शिवाय मंत्र जप, रुद्रपाठ, सत्यनारायण पूजा इ. प्रकारे उपासना केली जाते. 

ध्यानधारणा : हा काळ सात्त्विकतेचा, अध्यात्माचा, व्रत वैकल्याचा असल्याने या काळात मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा करणे लाभदायी ठरते. 

मंदिरात जाणे : श्रावणात महिनाभर रोज कोणत्याही एका मंदिरात जाण्याचा संकल्प केला जातो, त्यामुळे आपण अध्यात्मिक दृष्ट्या ईश्वराशी जोडले जातो. 

नकारात्मकतेच त्याग : या सर्व उपासनेबरोबर मनातून इतरांबद्दल वाईट विचार, वाईट शब्द, वाईट कृती जोवर सोडत नाही तोवर महादेव प्रसन्न होणार नाही. 

शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!

Click Here