संध्याकाळी कोणाला दही देऊ नये, कारण... 

शास्त्रात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण ऐकतो आणि फॉलो करतो, त्यामागचे कारणही जाणून घेऊ. 

१. गॅस बंद असताना त्यावर तवा किंवा कढाई ठेवू नये. आणखी अन्न मिळण्याची अग्नीला आस लागते. 

२. जुना तवा किंवा कढई कोणाला देऊ नये असे केल्यास, आपली कमाई लोकांसोबत वाटली जाते.

३. कणिक रात्री मळून फ्रिज मध्ये ठेवू नये. स्वाभाविकच तिचे पोषणमूल्य कमी होऊन अन्न खराब होते आणि अन्नपूर्णाचा अपमान होतो. 

४. सूर्यास्तानंतर कोणालाही दही देऊ नये. दही हे विरजण म्हणूनही संबोधले जाते, त्यामुळे कलह निर्माण होऊन केलेली उपासना वाया जाते. 

५. पोळपाट किंवा लाटण खूप वेळेपर्यंत न धुता ठेवु नये, त्यामुळे वस्तूला बुरशी लागून अन्न खराब होते आणि घरातील लोकांचे आरोग्य बिघडते. 

६. रात्री बाहेर कपडे वाळू घालू नये, त्यामुळे नकारात्मक शक्ती कपड्यांमध्ये शोषली जाते, तसेच रोगराईचाही धोका संभवतो. 

७. संध्याकाळी झाडाखाली बसून काहीही खाऊ नये. संध्याकाळी पक्षी झाडावर झोपतात. त्यांचा वावर असतो, त्यामुळे तिथे बसून खाणे अयोग्य ठरते. 

8. भांडून घराबाहेर पडू नये, पूर्ण दिवस वाईट जातो आणि अघटित घटना घडण्याचा संभव असतो. 

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल. 

Click Here