रात्रीच्या वेळी बऱ्याचदा घराच्या बाहेर किंवा आसपासच्या परिसरात कुत्रे रडायला लागले की काळजात धडकी भरते.
रात्री कुत्रा रडण्याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. म्हणूनच, कुत्र्यांचं रडणं शुभ की अशुभ ते जाणून घेऊयात.
कुत्र्याचं रात्री रडणं अशुभ मानलं जातं. हा एक अप्रिय घटना घडण्याचा संकेत असल्याचं म्हटलं जातं.
असं म्हटलं जातं की, ज्यांच्या घरासमोर कुत्रा रडतो त्यांच्या घरात एखादी वाईट घटना घडते.
एखाद संकंट येणार असेल तर ते कुत्र्यांना आधीच समजतं त्यामुळे ते रडतात असंही म्हटलं जातं.
आर्थिक नुकसान होणार असेल तरीदेखील कुत्रे रडून त्याचा संकेत देत असतात असा समज आहे. ( टीप- ही माहिती सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याविषयी लोकमत कोणताही दुजोरा देत नाही.)