वैद्यकीय क्षेत्रासाठी किंवा त्यांची वाहने, डॉक्टर, नर्स यांना ओळखण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो.
तुम्ही पाहिले असेल तर डॉक्टरांच्या वाहनावर किंवा अॅम्बुलन्सवर लाल रंगाचे अधिक चिन्ह असते.
या प्लस साईनचा अर्थ काय? ते कधी आणि कोणी ठरविले, कशासाठी...
खासकरून शेकडो वर्षांपूर्वी युद्धात सैनिक कोण आणि वैद्यकीय कर्मचारी कोण हे ओळखण्यासाठी या चिन्हाचा वापर सुरु झाला.
युद्धात लाल निशान म्हणजे युद्धाला सुरुवात आणि पांढरे म्हणजे शरणागती. या दोघांचा मिलाफ करून हे चिन्ह तयार करण्यात आले.
आता जे अधिक चिन्ह आहे, त्याचीही एक स्टोरी आहे. ते मुळात रेड क्रॉस या जगभरात युद्धकाळात वैद्यकीय मदत करणाऱ्या संस्थेचे चिन्ह आहे.
हेन्री ड्युनंट यांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी ही संस्था स्थापन केली होती. त्यापूर्वीपासून हे चिन्ह वापरले जात होते.
मुळात रेड क्रॉसच्या चिन्हावर साप आहेत. साप असलेली काठी दीर्घकाळापासून औषध आणि वैद्यकीय व्यवसायाचे प्रतीक आहे.
हे एस्क्लेपियसच्या कथेतून आले आहे, ज्याला प्राचीन ग्रीक लोक उपचारांचा देव म्हणून आदर करत होते आणि ज्याच्या पंथात सापांचा वापर समाविष्ट होता.
आजही तुम्ही पाहू शकता, डॉक्टरांच्या वाहनांवर सापांचे चिन्ह असलेले आणि प्लस चिन्ह असलेले दोन्ही चिन्हे असतात.
रेड क्रॉसच्या चिन्हाचा गैरवापर होऊ नये म्हणून आयएमएने अधिक चिन्हावर Dr. असे लिहिण्याचे ठरविले, अशाप्रकारे हे चिन्ह भारतात वापरले जाऊ लागले.