नागपंचमीनिमित्त नाग/साप यांच्या विश्वाशी निगडित गोष्टी सामान्य ज्ञान म्हणून का होईना, माहीत करून घेतल्याच पाहिजेत.
>> नागमणी, नागाच्या डोक्यावर केस इ. अंधश्रद्धा आहेत.
>> नाग डूख धरून, व्यक्ती लक्षात ठेवून पाठलाग करू शकत नाही.
>> साप अमर नसतात. सापाची कात विषारी नसते.
>> सामान्य नागरिकांनी साप बंदिस्त ठेवणे हा गुन्हा आहे. ती परवानगी संबंधित औषधनिर्माण क्षेत्रातील संशोधन संस्थांना असते.
४ विषारी प्रजाती - नाग, मण्यार, घोणस, फुरसे सोडून इतर बहुतेक जाती बिनविषारी किंवा निमविषारी असतात. त्यांच्या दंशाने माणसाचा मृत्यू होत नाही.
>> साप हाताळण्यामध्ये कुठलंही शौर्य नाही, आपण प्रमाणित सर्पमित्र नसल्यास साप हाताळू नयेत. दृष्टीस पडल्यास सर्पमित्रांना बोलवावे व सापाच्या हालचालीकडे फक्त लक्ष ठेवावे.
>> साप चावल्यानंतर त्या व्यक्तीला सरळ जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन जावे, कुठल्याही मंत्र तंत्राने विष उतरत नाही.
>> साप शेतकऱ्यांचे मित्र आहेत. हजारो किलो धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांना ते फस्त करतात, म्हणूनच हिंदू संस्कृतीत नागपंचमी हा सण त्यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून साजरा केला जातो.
>> नाग/ साप दूध पीत नाही, तो पूर्णतः मांसाहारी जीव आहे. त्यामुळे त्यांना दूध पाजू नका.
>> सापांना शक्यतो न मारता सर्पमित्रांच्या ताब्यात देणे, सापांच्या नैसर्गिक अधिवासात अकारण ढवळाढवळ न करणे, वाहने जपून चालवणे इ. मार्गाने आपण त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करू शकतो.