देव आपली निवड करू शकतो, पण आपण देवाची निवड करणारे कोण? हा प्रश्न मनात येत असेल तर अंक ज्योतिषाचा खुलासा वाचा.
आपल्या प्रत्येकाचे उपास्य दैवत वेगळे असते, पण त्याला जोड म्हणून आपल्या मूलांकानुसार स्वामी देवतेची केलेली उपासना लाभदायी ठरते.
आपल्या जन्मतारखेनुसार जो मूलांक निघतो, त्यानुसार देवाची उपासना करणे अधिक लाभदायी ठरते असे म्हणतात. ते देवता कोणते ते पाहू.
मूलांक १: ज्यांची जन्मतारीख १, १०, १९ आणि २८ असते, त्यांचा मूलांक १ असतो, त्यांनी श्रीरामाची उपासना करावी.
मूलांक २: ज्यांची जन्मतारीख २, ११, २० आणि २९ असते, त्यांचा मूलांक २ असतो, त्यांनी महादेवाची उपासना करावी.
मूलांक ३: ज्यांची जन्मतारीख ३, १२, २१ आणि ३० असते, त्यांचा मूलांक ३ असतो, त्यांनी दत्त गुरु, स्वामी समर्थ किंवा कोणत्याही गुरूंची उपासना करावी.
मूलांक ४: ज्यांची जन्मतारीख ४, १३, २२ आणि ३१ असते, त्यांचा मूलांक ४ असतो, त्यांनी गणपतीची, देवीची उपासना करावी.
मूलांक ५: ज्यांची जन्मतारीख ५, १४ आणि २३ असते, त्यांचा मूलांक ५ असतो, त्यांनी गणपतीची उपासना करावी.
मूलांक ६: ज्यांची जन्मतारीख ६, १५ आणि २४ असते, त्यांचा मूलांक ६ असतो, त्यांनी महालक्ष्मी किंवा कुलदेवीची उपासना करावी.
मूलांक ७: ज्यांची जन्मतारीख ७, १६ आणि २५ असते, त्यांचा मूलांक ७ असतो, त्यांनी गणपतीची, देवीची उपासना करावी.
मूलांक ८: ज्यांची जन्मतारीख ८, १७ आणि २६ असते, त्यांचा मूलांक ८ असतो, त्यांनी शनी देव, हनुमानाची उपासना करावी.