यंदा ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्ष असणार आहे, या काळात कावळ्याबरोबर पुढे दिलेल्या पशु-पक्ष्यांचे दिसणे शुभ लक्षण मानले जाते.
एरव्ही झोपमोड करणारा कावळा आपल्याला पितृपक्षात श्राद्धाचे ताट मांडताच चोच लावायला यावा असे वाटते, मात्र पितृपक्षात तोच गायब असतो.
गायब म्हणण्यापेक्षा तो दिसतो पण काही केल्या जेवायला येत नाही. यावर उपाय म्ह्णून शास्त्रानुसार पुढील प्राण्यांचे दिसणेही शुभ मानले जाते.
पितृपक्षात निर्विवादपणे पहिला मान कावळ्याला, श्राद्धाच्या नैवेद्याचे ताट ठेवताच कावल्याने टोच मारली तर ते शुभ लक्षण समजा.
पितृपक्षात गाय तुमच्या दाराशी येत असेल तर ते शुभ लक्षण समजा. याचा अर्थ पितरांचा तुम्हाला आशीर्वाद आहे.
पितृपक्षात दारावर कुत्रा आला तर त्याला हाकलू नका तर पोळी, भाकरी खाऊ घाला.
पितृपक्षात काळात घरात मुंग्यांची रांग लागली तर तेही शुभ लक्षण मानले जाते.
याबरोबरच चिमणी, पोपट, मैना हे जीव आपल्या सभोवती असतात. अंगणात, खिडकीत त्यांचा वावर वाढणे हेही शुभ लक्षणच!
सर्व जीवांचा सन्मान केल्याने, त्यांना जेवू घातल्याने आणि भूतदया दाखवल्यानेही पितरांची कृपा लाभते.
पितृदोष निवारणासाठी तसेच मोक्षप्राप्तीसाठी हे उपाय लाभदायी ठरतात आणि भविष्यात सुख समृद्धी देतात.