पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले असे म्हणतात, ते ज्यांच्या दारी असते त्यांना कोणकोणते लाभ होतात ते जाणून घ्या
पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि नाजूक केशरी देठ व सुगंधाची लयलूट करणारे झाड असते प्राजक्ताचे. त्यालाच संस्कृतमध्ये पारिजात असे म्हणतात.
पारिजात हे भारतात उगवणारे एक औषधी झाड आहे. ह्याच्या फुलांचा सुगंध मनमोहक असतो. शिवाय ते एक औषधी झाड आहे.
ज्यांच्या घराच्या आजूबाजूला प्राजक्ताचे झाड असते, त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तु दोष दूर होतात.
जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो, तिथे लक्ष्मी वास करते. कारण ही फुले तिला अतिशय प्रिय आहेत.
प्राजक्ताच्या सुगंधात तुमच्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे. त्याचा सुगंध तुमचे मन शांत करतो.
प्राजक्ताची फुले ज्यांच्या अंगणात ही फुले उमलतात, तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच नांदते.
हृदयरोगासाठी प्राजक्त खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा वापर करता येतो.
असा पारिजात तुमच्याही दारी असेल तर आरोग्य, ऐश्वर्य, आनंद आणि संपत्ति तुमच्या दाराशी सदैव राहील, त्यामुळे हे झाड आजच आपल्या अंगणात रुजवा!