संधिवात नेमका कसा होतो ते जाणून घेऊयात.
अनेकदा आपण लोकांकडून संधिवाताच्या त्रासाविषयी ऐकतो. या त्रासात संबंधित व्यक्तीला उठता-बसतांनाही बराच त्रास होतो.
जास्त थंड पदार्थ, कोरडे पदार्थ, जागरण करणे किंवा उपाशी राहणे यामुळे वातदोष निर्माण होतो व संधिवात होतो.
अयोग्य आहार जसं की, गार दही, तळलेले पदार्थ, मटार, वांगी, मांसाहार यांमुळेही संधिवाताचा त्रास होतो.
व्यायामाचा अभाव वा जुनी दुखणी यामुळेही संधिवाताची समस्या निर्माण होऊ शकते.
वाढत्या वयाप्रमाणे शरीरातील कॉल्शिअम आणि cartilage कमी होतं. आणि, संधिवाताचा त्रास सुरु होतो.
काही वेळा अनुवंशिकरित्याही संधिवाताचा त्रास होऊ शकतो.
वजन जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर सांध्यांवर ताण येतो आणि संधिवाताचा त्रास होतो.