अनेकांना अंजीर आवडत नाहीत. मात्र, त्याचे शरीरासाठी होणारे फायदे अफाट आहेत.
सुकामेवामध्ये आवर्जुन असणारा मेवा म्हणजे सुके अंजीर.
ड्राय अंजीर खाल्ल्यामुळे वजन कमी होतं. त्यामुळे अनेक जण डाएटमध्ये अंजीरचा समावेश करतात.
ड्राय अंजीरमुळे पचनसंस्थेशी निगडीत समस्या असतील तर त्या दूर होतात.
अंजीरमध्ये कॅल्शिअमचं प्रमाण जास्त असल्यामुळे हाड मजबूत होतात.
ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्यांना अनेकदा अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो. अंजीरमुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.