हेल्थ इन्शुरन्स काढला नाही? हे फायदे वाचून नक्कीच कराल विचार
हेल्थ इन्शुरन्स काढण्याचे अनेक फायदे आहेत.
सध्याच्या काळात हेल्थ इन्शुरन्स काढणं अत्यंत गरजेचं झालं आहे.
अनेक जण हेल्थ इन्शुरन्स काढण्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, त्याचे फायदे वाचले तर नक्कीच तुमच्या विचारात फरक पडेल.
पाहुयात हेल्थ इन्शुरन्स काढण्याचे काही फायदे.
काही उपचार फार मोठे नसतात. मात्र, २४ तासांपेक्षा जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये अॅडमीट व्हावं लागलं. तर, बेड चार्जेस, डॉक्टरांची फी, ऑपरेशन थिएटर, नर्सिंग, औषधे, ICU याचा सर्व खर्च विमा कंपनी भरते.
एखाद्या आजाराचं निदान झाल्यावर डॉक्टर काही चाचण्या, चेकअप करायला सांगतात. तसंच डिस्चार्जनंतर डॉक्टर फॉलोअप वगैरे घेतात. या सर्व गोष्टींचा खर्च विमा कंपनी करते.
काही विमा कंपन्या रुग्णवाहिकेचा खर्चही करतात.
काही विमा कंपन्या डे केअर ट्रीटमेंटचाही खर्च करतात. यात मोतीबिंदू, केमोथेरपी, डायलिसिस यांसारख्या ट्रीटमेंटचा खर्च केला दातो.
बाळंतपणाचा खर्चही विमा कंपनीद्वारे केला जातो. यात गर्भधारणा, बाळंतपण आणि प्रसूतीनंतरची काळजी, बाळाचं लसीकरण, तपासण्या यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो.