गायीला शिळे अथवा उष्टे अन्न का देऊ नये? काय होतं...? 

जाणून घ्या...

हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानले जाते. इतकेच नाही तर तिला 'गो-माते'चा दर्जा देण्यात आला आहे. तसेच गो-मातेमध्ये सर्व देवी-देवतांचा वास असतो, असेही मानले जाते.

गो-सेवा हे सर्वात मोठे पुण्यकर्म मानले जाते आणि घरातील पहिली पोळी गायीसाठी काढणे ही एक पवित्र परंपरा आहे.

परंतु काही लोक शिळी पोळी किंवा उष्टे अन्न गायीला देतात, ज्योतिषशास्त्रानुसार याचा काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रात, गायीला गुरू ग्रहाशी जोडून बघितले जाते. गुरू हा ज्ञान, धर्म, समृद्धी आणि भाग्याचा कारक आहे.

जेव्हा तुम्ही गायीला उष्टे किंवा शिळे अन्न खायला देता, तेव्हा तुमचा गुरू कमकुवत होतो, अशी मान्यता आहे. 

यामुळे भाग्य साथ देणे सोडून देते, ज्ञान आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रभावित होते आणि संतान संबंधी त्रास होऊ शकतो.

गायीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि ती शुक्र ग्रहाशी देखील संबंधित आहे, जो धन, वैभव, सुख आणि भौतिक आनंदाचा कारक आहे.

गायीला उष्टे अन्न खायला दिल्याने शुक्र ग्रह रुष्ट होतो, यामुळे घरात आर्थिक संकट निर्माण होऊ शकते.

एवढेच नाही, तर हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, गायीला पूर्वजांच्या मुक्तीशी आणि शांतीशीही जोडले जाते. यामुळे, गायीला शिळे अन्न खायला दिल्यास घरात पितृ दोषही निर्माण होऊ शकतो.

असे लोक स्वतःच स्वतःचं घर उद्ध्वस्त करून घेतात...! काय सांगतात आचार्य चाणक्य ...?

Click Here