केदारनाथ मंदिर कोणी बांधले?

केदारनाथ मंदिरात प्रत्येकवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक जातात.

केदारनाथ धाम हे उत्तराखंडमधील सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेले केदारनाथ मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

केदारनाथ मंदिर हे भगवान शिव यांना समर्पित आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. हे मंदिर उत्तराखंडमधील चार धामांपैकी एक आहे.

केदारनाथ मंदिराचा इतिहास बराच प्राचीन आहे. असे मानले जाते की हे मंदिर हजारो वर्षे जुने आहे आणि त्याचा उल्लेख महाभारत काळाशी संबंधित आहे.

केदारनाथ मंदिर हे पांडवांशी देखील संबंधित आहे. युद्धानंतर पांडव त्यांच्या पापांपासून मुक्तीसाठी भगवान शिवाकडे आले होते, असे म्हटले जाते.

पांडवांना पाहिल्यानंतर भगवान शिव यांनी बैलाचे (नंदीचे) रूप धारण केले आणि या ठिकाणी लपले, असे म्हटले जाते .

पांडवांनी शिवलिंगाची स्थापना केली. पांडवांनी शिवाच्या पाठीच्या रूपात दिसणारे शिवलिंग स्थापित केले. मंदिराची सुरुवात अशा प्रकारे झाली,असे मानले जाते .

सध्याचे भव्य दगडी मंदिर आदि शंकराचार्य यांनी ८ व्या शतकात पुनर्बांधणी केली होती. हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५८३ मीटर उंचीवर आहे.

उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर सहा महिने बर्फाने झाकलेले असते. हिवाळ्यात मंदिराचे दरवाजे बंद असतात. त्या काळात उखीमठमध्ये बाबा केदारनाथची पूजा केली जाते.

२०१३ मध्ये केदारनाथ धामवर एक आपत्ती आली. विनाशकारी पूर आणि आपत्तीत मंदिर संकुलाचे मोठे नुकसान झाले, परंतु मुख्य मंदिर चमत्कारिकरित्या सुरक्षित राहिले.

टीप- येथे दिलेली सर्व माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.

Click Here